मूर्तिजापूर - शहरात असलेल्या नगर परिषदेच्या शाळांवर कायमस्वरूपी चौकीदार नेमण्यात यावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष व्दारकाप्रसाद दुबे यांनी मुख्याधिकारी यांना . दिनांक १८ एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती,टांगा चौक, येथे दाट वस्ती असुन तेथे नगरपालिकेच्या पाच शाळा असुन गरिब गरजवंत विद्यार्थी या शाळेत आहेत. या शाळेचा परिसर विद्यार्थ्यांसाठी असुरक्षित झाला आहे. याआधी शाळेच्या परिसरात दोन शिपाई राहत होते. त्यांनी स्वताःचे घर खाली केल्यामुळे त्यांचे येथे राहणे बंद झाले आहे. यामुळे या पाच शाळेत चौकीदार नसल्याने येथे अवैध काम सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. शाळेला कोणी वाली नसल्याने गेट उघडे असल्यामुळे या शाळेत एखादी घटना होऊ शकते. नगरपालिकेच्या शाळेच्या साहित्याचे सुध्दा नुकसान होत आहे. तरी विद्यार्थ्यांच्या हितासाठी तसेच परिसरातील नागरीकांच्या जनहितासाठी येथे चौकीदार नेमणुक करावी.शाळेच्या सुरक्षेतेसाठी कायम चौकीदाराची नेमणुक करण्यात यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष व्दारकाप्रसाद दुबे यांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी नगर परिषद यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
