मूर्तिजापूरात पहिल्यांदाच निशु:ल्क " भव्य रंगभरण " स्पर्धेचे आयोजन...!

 


पत्रकार मंडळी व ॲकेडेमिक हाईट्स पब्लीक स्कुल यांचा संयुक्त उपक्रम




मूर्तिजापूर - शहरासह तालुक्यातील समस्त पत्रकार मंडळी व सी.बी.एस.ई मान्यताप्राप्त अकॅडेमिक हाईट्स यांच्या संयुक्त विद्यमाने मूर्तिजापूर शहरासह तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क भव्य रंगभरण स्पर्धेचे आयोजन दिनांक २४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे. 

       सदर स्पर्धा दोन वयोगटात होणार असून दिलेल्या चित्रात विद्यार्थ्यांना आकर्षक रंगयोजना करायची आहे. वयोगट ३ ते ६ व ७ ते १२ दरम्यानच्या विद्यार्त्यांसाठी विविध प्रकारचे चित्र नियोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही. या स्पर्धेचे मुल्याकंन होऊन आकर्षक बक्षीक्षेही देण्यात येणार आहे. राष्ट्रीय शिक्षा धोरणानुसार कला विकास असेल तरच शैक्षणिक विकास व्दिगुणित होतो. त्यामुळे कला आणि शिक्षण यांचा मिलाप घडविण्यात येथील पत्रकार मंडळीनी पुढाकार घेतला आहे. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदर स्पर्धा गुरुवार दिनांक २४ एप्रिल रोजी सकाळी ९. ०० वाजता येथील हिरपूर रोड स्थित अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्रेऑन्स किंवा रंगीत पेन्सिल किंवा पोस्टर कलरचा वापर करायचा आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित साहित्य सोबत घेऊन यावे. असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रशासकीय अधिकारी ८०९२८७९२८७ वर संपर्क करावा असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कळविण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post