प्रतिनिधी/ पवन पाटणकर
शिराळा : स्थानिक शिराळा हे गाव अमरावती ते चांदुर बाजार मार्गावर असलेले मुख्य व मोठे गाव आहे या गावालगत मुख्य चांदुर बाजार अमरावती महामार्ग गेला आहे.
या मार्गामुळे चांदुर बाजार ते अमरावती अंतर कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक याच मार्गाने होत असते.अश्यातच शिराळा गावातील मुख्य मार्गाच्या मधोमध रस्ता दुभाजक निर्माण केले आहे.
परंतु या रस्ता दुभाजकामुळे अनेक अपघात या गावाजवळ होत आहे. या दुभाजकावर कोणत्याही प्रकारचे लाईट किंवा वाहनचालकाला दुरून दिसेल अश्या कुठल्याही प्रकारची उपाययोजना नाही.चांदुर बाजार कडून अमरावती जाताना किंवा येताना कुठलाही सिग्नल किंवा लाईट या दुभाजकावर नाही.
त्यामुळे येणारी वाहने खूप वेळा रात्रीला दुभाजक दिसत नसल्यामुळे त्यावर जाऊन आदळतात व अपघात होतात.या अगोदर पण खूप अपघात या रस्ता दुभाजकामुळे झालेले आहे.असाच अपघात काल शनिवार रोजी रात्री 7 ला झाला.
भंगार टू व्हिलर वाहने अमरावती कडे घेऊन जाणारा ट्रक क्र.एम. एच 04 डी के 5898 दुभाजकाला टक्कर देऊन पलटी झाला.
यामध्ये ट्रक चालकाला किरकोळ दुखापत झाली व काही वेळ ट्रक रस्त्यात आडवा पडून राहिला व त्यामुळे रस्ता काही वेळ बंद राहिला ट्रकातील वाहने रस्त्यावर पडली यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.
याआगोदर स्थानिक मुलांनी स्वखर्चातून यावर अपघात टाळता यावा याकरिता रेडियम बोर्ड उभे केले परंतु त्याचा पाहिजे तसा उपयोग झालेला नाही.
या ठिकाणी रस्ता दुभाजकाला सुरवातला सिंगल लाईट सिग्नल बसवावा अशी स्थानिक लोकांची मागणी आहे. असे नाही झाल्यास येथे अपघाताचे प्रमाण वाढतच जाईल त्यामुळे प्रशासनाने स्थानिक नागरिकांची मागणी ऐकून रस्ता दुभाजकाला सुरवातीला एक लाईट सिग्नल बसवावा स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासनाने यावर तात्काळ निर्णय घ्यावा अशी शिराळा येथील नागरिकांनी मागणी केली आहे.