१ मे च्या शेतकरी आंदोलनासाठी २१ एप्रिलला मूर्तिजापूरात नियोजन सभा...!





मूर्तिजापूर - शेतकरी जागृती अभियानांतर्गत प्रगती शेतकरी मंडळाच्या वतीने १ मे रोजी राष्ट्रीय महामार्गावर अंतवधान आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी २१ एप्रिल रोजी प्रगती शेतकरी मंडळ कार्यालयात नियोजन सभा होणार आहे.



      तालुक्यातल्या निंभा, हातगाव, जामठी व कुरूम सर्कलमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करूनही अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. या आंदोलनात प्रगती शेतकरी मंडळ, जनमंच, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आंतरभारती संस्था, न्यू यंग क्लब फार्मर्स ग्रुप आणि यंग बॉइज क्लब कोळगाव या विविध संस्था सहभागी होणार आहेत. या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजू वानखडे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post