राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत एम बी कराटेच्या खेडाळूंची चार सुवर्ण पदकास गवसणी...!


  


मूर्तिजापूर - नागपूरच्या शतकोन कराटे इंडियन नॅशनल फेडरेशन यशोदा बौद्ध विहार कपील नगर नागपूर कराटे क्लब येथे आयोजीत राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत मूर्तिजापूरच्या एम बी कराटे क्लासच्या खेडाळूनी बाजी मारत चार सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.



                  सदरची राज्यस्तरीय कराटे स्पर्धा हि कानशोडो शतकोन कराटे मेंबर ऑफ इंटरनॅशनल जपान सेन्सई सुमित नागदेवते यांनी दिनांक २० एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा उत्साहात पार पडली यामध्ये अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील एम बी कराटे क्लासचे संचालक सेसंई गंगाधर जाधव यांच्या मार्गदर्शनासह उपस्थितीत खेडाळूंनी सहभाग नोंदवून आपल्या कौशल्याचे उत्तम सादरीकरण करत चार सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. सदर स्पर्धेत सहभागी मंथन चिंचे,आडवी शर्मा,विभव डिवरे ,अविनाश लालवाणी या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत असून यशाचे श्रेय आई-वडील ,शिक्षक, प्रशिक्षक सेसंई गंगाधर जाधव यांना देत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post