क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुलेना अभिवादन...!

 


क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुलेना अभिवादन...!





अकोला - शहरातील अशोक वाटिका येथे बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी होते. मान्यवरांच्या हस्ते अशोक वाटिका येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. महिलांसाठी पहिली शाळा चालू करणाऱ्या महात्मा फुलेंच्या जीवन कार्यावर मान्यवरानी प्रकाश टाकला. यावेळी महिला अनुराधा ढिसाळे, पंचशील गजघाटे, संदीप नरवणे, अजिंक्य सूर्यवंशी, अनिल येरकर, भास्कर सोनावणे, गणेश नुपनारायण, प्रकाश तेलगोटे, प्रतीक सोनवणे, सुनील तायडे, निशिकांत सरदार, स्वाती डोळ, शारदा वानखडे, प्रीती खांडेकर, अलका इंगळे, वंदना इंगळे सचिन तायडे, प्रवीण उडतकर, विशाल घायवट यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नोंदणीकृत बांधकाम कामगार उपस्थित होते. यावेळी घरगुती साहित्य मिळण्यासाठी बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post