मूर्तिजापूर - प्रकाशवाट प्रकल्पात सन २०२४-२५ करीता सुपर ५०/२.० नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षे करीता आता पर्यंत ३०० विद्यार्थ्यांनी केली नोंदणी. गाडगे महाराज विद्यालय मुर्तिजापूर येथे १२ वर्ग खोल्यामधून ३०० विद्यार्थी देणार निवड चाचणी.प्रकाश वाट प्रकल्प तालुका शिक्षण समन्वय समिती शिक्षण विभाग मुर्तीजापुर च्या संयुक्त विद्यमाने आयोजित बहुप्रतिक्षित सुपर फिफ्टी २.० जवाहर नवोदय विद्यालय मोफत शिकवणे वर्ग २०२५-२६ करिता निवड चाचणीचे आयोजन दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी गाडगे महाराज विद्यालय येथे सकाळी ९ ते १ या वेळेत करण्यात आले आहे त्याकरीता इयत्ता ४ थी मधील हुशार होतकरू गरीब ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना संधी देऊन निवड चाचणीत सहभागी करून घेण्यात आले आहे आतापर्यंत जवळपास ३०० विद्यार्थ्यांचे
नोंदणी झाली आहे. एकूण १२ वर्ग खोल्यांमध्ये या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असून परीक्षा निकोप वातावरणात संपन्न करण्याच्या दृष्टीने शिक्षकां व्यतिरिक्त इतर गटसाधन केंद्रातील कर्मचाऱ्यांचे पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा चे संपूर्ण नियोजन, आमदार हरीश पिंपळे व गटशिक्षणाधिकारी संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशवाट प्रकल्प व शिक्षण विभाग मुर्तिजापूर ची संपूर्ण टीम करत आहे.
या करीता केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून प्रतिसाद मिळत आहे. तरी जास्तीत हुशार होतकरू विद्यार्थ्यांनी या निवड चाचणी चा फायदा घेण्याचे आवाहन प्रकाशवाट प्रकल्प टीम ने केले आहे. अधिक माहिती करीता शिक्षक मोहम्मद अली, व शिक्षक देवके यांच्याशी संपर्क करण्यात यावा असे परीक्षा आयोजन समितीच्या वतीने लेखी स्वरूपात कळविण्यात आले.