गुरुचंद्रमणी बुद्ध विहारात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न




शिराळा येथील गुरुचंद्रमणी बुद्ध विहारात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न     




      जिल्हा प्रतिनिधी : पवन पाटणकर       

 

शिराळा  :  येथील गुरु चंद्रमणी बुद्ध विहारात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन केले होते. त्याप्रमाणे कस्तुरबाई जैन विद्यालय शिराळा येथे वर्ग ५ ते १० च्या विद्यार्थ्यांनी सकाळी ९ ते १० वाजता परिक्षा घेण्यात आली.सामान्य ज्ञान परीक्षा ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन शे मुला मुलींनी सामान्य ज्ञान परीक्षा दिली. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ही परिक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी दरवर्षी ही परिक्षा घेण्यात येते. युवा आक्रमक भिमशक्ती मंडळ, शिराळा यांनी मालाचे सहकार्य केले. यावेळी विशाल तायडे, सुरज वानखडे, सुशिल वानखडे, प्रणय तायडे, अजय तायडे, मंगेश मोहोड, सम्यक वानखडे अमित वानखडे, संकेत चव्हाण, सत्यजित नितवणे, सिद्धार्थ ततंरपाळे, सुमिधा उर्फ पिंकी तेलमोरे, अंगणवाडी सेविका जयश्री सिरसाट, रिना मोहोड, शिल्पा वानखडे, भावना सिरसाट, तनु गवई आदी मुला मुलींनी सामान्य ज्ञान परीक्षेला उपस्थित राहुन सहकार्य केले.सामान्य ज्ञान परीक्षेचा निकाल लागल्यानंतर प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येईल.

Post a Comment

Previous Post Next Post