गणोजा ते सोनोरी रोडचे बांधकाम रखडले, सामाजिक कार्यकर्त्याची ठेकेदारावर कारवाईची मागणी

 


          जिल्हा प्रतिनिधी : पवन पाटणकर

चांदूरबाजार : गेल्या दोन वर्षांपासून गणोजा ते सोनोरी या रस्त्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात आले होते. मात्र, मागील एका वर्षापासून हे काम पूर्णतः बंद पडले आहे. या रखडलेल्या कामामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, याबाबत सामाजिक कार्यकर्ते योगेश इसळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चांदूरबाजार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

योगेश इसळ यांनी सांगितले की, "गणोजा ते सोनोरी रस्त्याचे बांधकाम सुरू झाल्यापासून त्यात सातत्याने दिरंगाई होत आहे. गेल्या वर्षभरापासून तर हे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत असून, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हे प्रकरण गंभीर बनले आहे. अशा ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे आणि काम पूर्ण करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत." 

या रस्त्याच्या रखडलेल्या बांधकामामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून, नागरिकांना दैनंदिन प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत आहे. योगेश इसळ यांच्या तक्रारीनंतर आता सार्वजनिक बांधकाम विभाग काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post