वर्धा जिल्ह्यातील उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला शिंदे गटात प्रवेश;वर्धा जिल्ह्यात घेणार शिवसेना शिंदे गट उंच भरारी..
महाराष्ट्र : वर्धा जिल्ह्यातील उबाठा गटाचे सहसंपर्क प्रमुख रविकांत बालपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगवा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी त्यांच्यासह उबाठाचे वर्धा जिल्हा सल्लागार प्रशांत शहागडकर, जिल्हा प्रमुख श्रीकांत मिरपूरकर, जिल्हा समन्वयक दशरथ जाधव, पुलगावचे निवासी उपजिल्हा प्रमुख डॉ. निलेश गुलाने, उपजिल्हाप्रमुख अजिंक्य तांबेकर, आष्टीचे तालुकाप्रमुख चंद्रशेखर नेहारे, देवळीचे उपतालुकाप्रमुख निलेश मोटधारे, आशिष वैरागडे, संदीप टिपले, विपीन काकडे, भूषण जाधव यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
तसेच लातूर जिल्ह्यातील छावा आणि गनिमी कावा संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जोगदंड, देव जयंत गंगणे, उपाध्यक्ष सुनील साखरे जिल्हाध्यक्ष सचिन कदम आणि कपिल टिचपल्ले, कांचन मगर, चिमाजी बाबर, निखिल देशमुख अमोल ढगे यांनी देखील शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी शिवसेनेचे विदर्भ संपर्कप्रमुख आणि आमदार नरेंद्र भोंडेकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, युवासेनेचे हर्षल कदम तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.