शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन तालुका काँग्रेस कमिटी धडकली तहसील कार्यालयावर






                 प्रतिनिधी : पवन पाटणकर

अमरावती: चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात राष्ट्रीय काँग्रेस कमिटी चांदूरबाजार ग्रामीणच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या बाजूला प्रथम आंदोलन करण्यात आले आश्वासन देणाऱ्या ईडीची विधी दाखवून सत्तेचा गैरवापर करणाऱ्या भाजप सरकारचा विविध नारे देऊन निषेध करण्यात आला.

     यावेळी शेतकऱ्यांच्या विविध समस्याचे निवेदन ग्रामीण काँग्रेसच्या वतीने चांदूरबाजार तर्फे तहसील कार्यालय चांदूरबाजार येथे निवेदन सादर करण्यात आले या निवेदनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसिल कार्यालय कर्जमाफी च्या घोषणा देण्यात आले तसेच निवेदनात मागण्यांचा समावेश करण्यात आला निवडणुकीपूर्वी आश्वासन देऊ नये शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत कर्जमाफी दिली नाही.

   त्यामुळे तात्काळ कर्जमाफी करावी नियमित कर्ज मिळणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही प्रोत्साहन मिळालेले नाही त्यांचे अनुदान थेट खात्यात जमा करण्यात यावे 2024 ते 25 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी बाजारात योग्य भाव न मिळाल्याने अडचणीत आलेल्या पिकांसाठी भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान द्यावे पीक विमा योजने अंतर्गत तात्काळ विमा रक्कम शेतकऱ्यांना द्यावी कृषी पंपासाठी रात्री ऐवजी दिवसा 20 पुरवठा करण्यात यावा घरकुलाचे पैसे पीक विम्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत नसून पिक विमा पासून चांदुरबाळा तालुक्यात काही मंडळी वंचित आहे.

   त्यांना पीक विम्याचे पैसे देण्यात यावे निवेदन देते वेळी ग्रामीण काँग्रेस चांदूरबाजार तालुकाध्यक्ष किशोर देशमुख खरेदी-विक्री चे अध्यक्ष डॉ प्रताप कीटुकले खरेदी विक्री संचालक श्रीकृष्ण वानखडे भाई देशमुख विलास शेकार राजाभाऊ उल्हे योगेश ईसळ राजाभाऊ बंड किशोर किटुकले अवधूत मातकर अ आरीफ, विजय राऊत, शैलेश टेकाळे, सुरज लंगोटे, विशाल बेले, सुधीर साखरे मनोज देशमुख अमोल देशमुख, कैलाश देशमुख, राहुल वाटाणे, डॉ काशीकर अभिजीत सावरकर ,उमेश तायडे ,सुरेश नागापुरे, अ सलाम निलेश डांगे ,नंदकिशोर मानेकर, विजय गवई ,शिवाजी काळे, देवानंद गोहत्रे ,राजेंद्र भुयार ,गजानन देशमुख, शिवानंद मदने वासुदेव देशमुख, सुरेश अकोलकर हे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post