दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण
प्रतिनिधी : पवन पाटणकर
शिराळा : जम्मू कश्मीर मधील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेक हिंदू भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याचा निषेध शिराळा येथील श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना अमरावती तालुकाप्रमुख मंगेश काळमेघ यांच्या नेतृत्वात करण्यात आला.
शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश काळमेघ यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या शिवसेनेतर्फे निषेध आंदोलनात निष्पाप हिंदू पर्यटकांची निर्घृण हत्या करणाऱ्याच्या विरोधात पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवाद मुर्दाबाद, भारत माता की जय अशा प्रकारच्या नारेबाजीने परिसर दणाणून गेला होता.
सद्यस्थितीत संपूर्ण देशात पाकिस्तान आणि दहशतवाद विरोधात रोष व्यक्त होत आहे.
दहशतवाद्यांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशा प्रकारची कारवाई शासनाने करावी अशी मागणी निषेध आंदोलनादरम्यान शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश काळमेघ, शिवसेना शाखा शिराळा व नागरिकांनी केली आहे.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांमध्ये शाखाप्रमुख वैभव मुंदाणे, शाखा संघटक निलेश कुकडे, उपशाखाप्रमुख स्वप्निल जीभकाटे, सचिव अर्पित नवरंगे, सहसचिव भूषण पाटणकर, कोषाध्यक्ष कैलास मानकर, रोशन पाटणकर, संकेत जीभकाटे, दिनेश पटले, रितेश घुरडे, अक्षय कावरे, आशिष बांबल, वैभव पटले, प्रवीण राऊत, शुभम वाडेकर, कैलास गंधे, अनुप पटले, सुमित निंघोट, राहुल पाटील, कुंदन राऊत, प्रफुल कडू, सौरभ देशमुख, यश कडू, आशुतोष देशमुख, वेदांत कडू, तेजस टोम्पे, ऋषिकेश मुंदाणे, पार्थ खाडे, दिव्यांशू ढेवले, अंकुश तुळे, सतीश पटले, चेतन पाटील, अक्षय भस्मे, आशिष कडू, गणेशराव पाठक, अभिषेक घुरडे, कृष्णा राजगिरे, बाबू मानकर, राजेश कुकडे, योगेश मानकर, विकास मानकर, दर्शन वाघाडे, बबलू मिसार, सतीश मानकर, सागर टोम्पे, जय देशमुख, सार्थक टोम्पे, राहुल पाटील, अक्षय पटले, रमेश राव देशमुख, विजयराव देशमुख, विजुभाऊ ताजने, जय देशमुख, ओम देशमुख, सुरज उके, अमोल जवंजाळ, प्रेम जिभकाटे, प्रतीक कोल्हे, सार्थक टोम्पे, आशुतोष देशमुख, स्वराज मानकर, रामरावजी बालपांडे, गणेश पाठक, पिंटू पुनसे, अजय हरणे,रितेश देशमुख व मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते..