जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदगी तांडा येथील इयत्ता पाचवी वर्गातील दोन विद्यार्थी "शिष्यवृत्ती परीक्षेत" चमकले.
"यश मिळत नसते सहजपणे,
प्राप्त करावे लागते कष्टाने,
शिक्षकांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाने,
पालकांच्या सकारात्मक सहकार्याने,
आणि विद्यार्थ्यांच्या त्या अथक प्रयत्नाने..
अगदी याच उक्तीप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदगी तांडा येथील इयत्ता पाचवी वर्गातील दोन विद्यार्थी कृष्णा ज्ञानेश्वर राठोड ,मयुरी राहुल राठोड शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत. यामध्ये त्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक कवटिकवार ,वर्गशिक्षक भवरे मॅडम,आणि शिक्षक- नागापुरे, डुकरे , धुमाळे , व पालक,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडित जाधव , उपाध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड, व सर्व सदस्यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे प्रयत्न या सर्वांचा मोलाचा वाटा आहे.