मूर्तिजापूर - येथील सि.बी.एस.ई मान्यताप्राप्त ॲकेडमिक हाईट्स, पब्लिक स्कूल तर्फे आयोजित मॅजिक शोला ३ ते १० वयोगटातील बालकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला नागपूर येथील सॉफ्टवेअर इंजिनीयर आशिष देशपांडे ह्यांनी विविध जादूचे प्रयोग सादर करीत विद्यार्त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य झळकत होते.
अचंबित होऊन प्रत्येक प्रयोगावर ते टाळ्यांचा कडकडाट करीत होते. शाळेचे प्राचार्य डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांच्या हस्ते ‘मॅजिक शो’ चे उदघाटन झाले. सदर कार्यक्रमात सर्वप्रथम जादूगर आशिष यांनी बिना माचीस दीप प्रज्वलन करून सर्वांना आश्चर्याचा धक्का देऊन अचंबित केले. एकाच बॉक्समधून विविध प्रकारचे गिफ्ट्स, कानातून, नाकातून, डोक्यातून, पाणी काढून हृदयाचा ठोकाच चुकविला होता.
अनेकविध प्रयोग सादर करतांना मराठी, हिंदी व इंग्रजीतून स्पष्टीकरण जादूगार आशिष देत होते कार्यक्रमाचे संचालन अनिर्बन चॅटर्जी, प्रशांत पंत, यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमासाठी दीपाली देशमुख, सचिन वाकोडे, राखी पिंजरकर, विष्णुप्रिया त्रिवेदी, कौशिक भट्टाचार्यजी, विवेक सुरळीकर, अनुप भटकर, सागर अग्रवाल, आम्रपाली आदींनी परिश्रम घेतले. प्रशासकीय अधिकारी शिव नारायण ह्यांच्या मार्गदर्शनात सागर कनकुरे, अंजली बायस, दुर्गा चांदवाणी, कोमल पटवारी,मुरलीधर तांबळे यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ व मनोरंजनाचे आयोजन केले होते. तीनशे हुन अधिक पालकांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला.