आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी सक्रियपणे कार्यरत असलेल्या विद्या परचाके यांची अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,यवतमाळ महिला तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही निवड यवतमाळ येथील गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस येथे दिनांक 17 एप्रिल( गुरुवार) रोजी पार पडलेल्या विशेष बैठकीत करण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद (महाराष्ट्र शाखा) महिला प्रदेशाध्यक्ष तथा प्रदेश सचिव,महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी नंदिनी टारपे होत्या.
यावेळी त्यांनी उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत सांगितले. आदिवासी महिलांनी केवळ समस्या मांडत न बसता, त्या सोडवण्यासाठी पुढे यावं,संघटित व्हावं आणि नेतृत्वात भाग घ्यावा.आपलं भविष्य आपल्याच हाती आहे..
या प्रसंगी राजेश टारपे यांनी मनोगत व्यक्त करत,नंदिनी टारपे यांच्या सामाजिक कार्याचा आणि संघर्षाचा उल्लेख केला.तसेच कॉ.सचिन मनवर यांनी जिल्ह्यातील समस्या व उपाययोजनांवर सखोल मते मांडली.प्रा. पंढरी पाठे यांनी विद्या परचाके यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांचे सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक योगदान अधोरेखित केले.
नियुक्तीनंतर विद्या परचाके यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानून सांगितले, तालुक्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहीन.
बैठकीस मंगला सोयाम,जयश्री मडावी,अनिता सलाम,निशा वाघाडे, संगीता पुरी,संगीता मेश्राम,ऋतुजा महल्ले,प्रा.मोहिनी कुडमेथे,लीना नैताम, रेखा सिडाम,जया मडावी,मुख्याध्यापिका संगीता सिडाम,सचिन भादिकार,वैष्णवी गेडाम,संगीता मडावी,यांच्यासह अनेक मान्यवर महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.यावेळी कार्यक्रमाचे संचालन निशा वाघाडे,तर आभार अनिता सलाम यांनी मानले.

