मूर्तिजापूर - सामान्य ज्ञान परिक्षा, शालेय निबंथ , वक्तृत्व व क्रिडा स्पर्धा , स्वाध्यायमालांचे आयोजन आणि दर तिन वर्षांनी वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व्याख्यामाला तसेच सांस्कृतिक कर्यक्रमाचे आयोजन करुन विद्यार्थ्यांच्या ज्ञान संवर्धनाचा ध्यास लावून सकस नव युवा पिढी घडावी हे ध्येय बाळगून कार्य करणारे अनिल डाहेलकर. गेल्या अनेक वर्षांपासून गरजू गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व दहावी च्या विद्यार्थ्यांना पाच सहा पुस्तकांचा संच जि. प.शाळेस देत असतात. मुर्तिजापुर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दिडशे च्या जवळ पास शाळा आहेत. त्यातील 70 शाळांना सदिच्छा भेटी दिल्या. या भेटीत विद्यार्थ्यांन बरोबर हितगुज साधत अभ्यास व खेळांबद्दल गोड़ी वाढविली. तसेच उत्कृष्ट शिक्षण देणारे शिक्षक घेरुन अकरा शिक्षकांचा गौरव केला, तर तिन शिक्षकांचा गुरुगौरव पुरस्कार देवून त्यांना संमानित केले शैक्षणिक क्षेत्रातील नेहरु युवा मंडळाच्या वतीने राबविलेल्या युवाश्री. अनिल डाहेलकर यांच्या या कार्याची दखल घेत मुंबई येथिल संकल्प चारिटेबल ट्रस्ट च्या वतीने पुणे येथील सदाशिव पेठेतील महाराष्ट्र साहित्य सभागृहात भिम जयंतीच्या पुर्व संध्येस भारतरत्न डॉ.बखबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने भन्ते हर्षवर्धन शाक्य, सुपरिचित गायिका व सामाजिक कार्यकर्त्या जोत्सना शेटे, सौ. विणा खांडविलकर यांच्या उपस्थितीत सिने कलावंत , लेखक ,निर्माता निर्दशक डॉ.शरद एम. गोरे यांच्या हस्ते प्रदान करुन संमानित करण्यात आले. तसेच भिम जयंती दिनी अयोध्या येथिल त्रैतायुग फाऊंडेशन च्या वतीने व्ही. सी. द्वारे ऑनलाइन पद्धतीने आयोजित कार्यक्रमात सहभागी करून आरोग्य क्षेत्रातील कृष्ठरोग निर्मूलन, पल्स पोलिओ लसीकरण मोहीम , एड्स जनजागृती, तसेच करोणा काळात .. इतर पेशंट रुग्णांना अल्प दरात वाहतूक सेवा या कार्यासाठी डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहिर नोंदविला गेला असून लवकर च त्यांना तो भारतीय पोष्ट सेवे द्वारे घर पोच प्राप्त होणार आहे.
सलग तिन पुरस्कार प्राप्त करणाऱ्या डाहेलकर यांनी मिळालेला शैक्षणिक क्षेत्रातील हा पुरस्कार त्यांचे आताप्रयंतचे सर्व शिक्षक - गुरुवर्य आणि मार्गदर्शक मान्यवरांना समर्पित केला आहे घर पोच येणारा पुरस्कार आई श्रीमती चंद्रकलाबाई नमदेवराव डाहेलकर यांच्या चरणी अर्पण करण्याचा मानस व्यक्त केला आहे.