सौर ऊर्जा पॅनल लावण्याच्या नावाखाली १ लाख ८० हजाराची फसवणूक...!

 


जातीवाचक शिवीगाळ करून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी




मूर्तिजापूर - तालुक्यातल्या जितापूर खेडकर येथील रहिवाशी असलेले जोगेंद्र प्रेमदास तायडे यांना घरावर सौर ऊर्जा पॅनल घरावर लावून देण्याच्या नावाखाली एका व्यवसायिकांने लाखो रुपयांची फसवणूक केली असल्याचा प्रकार दिनांक २९ एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीवरून उघडकीस आला.

            दिलेल्या तक्रारीत नमुद असल्याप्रमाणे अमरावती येथील रहिवाशी अभिजीत सुरेंद्र धर्माळे व त्यांचे सोबत एक महिला असे तक्रारदार यांचे घरी जाऊन त्यांच्या मूर्तिजापूर येथील घरी धर्माळे यांच्या युनिफाई सोलर एनर्जी कंपनीतर्फे सौर ऊर्जा पॅनल लावून देऊ असे म्हणून त्यांच्याकडून १ लाख ८० हजार रुपये ऑक्टोबर २०२४ मध्ये प्राप्त करून सुद्धा त्यांना त्यांच्या घरी कुठलाही सोलर पॅनल लावून दिला नाही. पैसे दिल्यानंतर तायडे यांनी वारंवार अभिजीत धर्माळे यांना त्यांच्याकडे सोलर पॅनल लावून देण्याची विनंती केली परंतु अभिजीत धर्माळे नेहमी उडवा उडवीची उत्तरे देत होते व त्यांना त्यांचे पैसे सुद्धा परत करत नव्हते शेवटी जोगेंद्र तायडे यांनी ज्यावेळेस अभिजीत सुरेंद्र धर्माळे यांना म्हटले की तुम्ही माझी फसवणूक केली याबाबत मी तुमचा रिपोर्ट देईल या कारणा वरून अभिजीत धर्माळे व त्यांची बिजनेस पार्टनर महिला यांनी जोगेंद्र तायडे यांनाच जातीवाचक शिवीगाळ करून म्हटले की, तुझे पैसे पण देत नाही आणि तुला सौर पॅनल पण देत नाही व जास्त आगाऊपणा केला तर तुला खोट्या केसेस मध्ये अडकवून देईल अशी धमकी सुद्धा दिली अशाप्रकारे १ लाख ८० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याने व त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याने जोगेंद्र तायडे यांनी पोलीस स्टेशन माना व पोलीस उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांना लेखी तक्रार केली आहे. यावर पोलीस काय कारवाई करणार याकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष लागले असून तायडे यांच्या सारख्या आणखी काही वेगवेगळ्या ठिकाणी ग्राहकांच्या फसवणूक झाल्याचे तायडेनी दिलेल्या तक्रारीवरून नागरिकांत बोलल्या जात आहे.



Tags :-  #GavakadachiBatmi, #सौरउर्जा, #मानापोलीसस्टेशन, #मूर्तीजापूर, #बातमीफसवणूक, #गावाकडचीबातमी, मराठीबातमी, #महाराष्ट्रपोलीस, #sdpo #murtizapurnews #gavsaheli,  #Devendrafadnvis, #letestnews #Solar energy #Sub-Divisional Police Officer Murtijapur 

Post a Comment

Previous Post Next Post