भिमक्रांती सामाजिक संघटनेचे वतीने संत कबीर नगर येथे नवीन मतदार नोंदणी व बांधकाम कामगार नोंदणी शिबिर संपन्न....!


Gavakadachi Batmi Network 


अमरावती :  दिनांक 27/04/2025 रविवार रोजी भिमक्रांती सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने संत कबीर नगर (मांडवा झोपडपट्टी)लक्ष्मी नगर रोड,अमरावती येथे सकाळी 9:00 वाजता ते 5:00 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले.संत कबीर नगर येथील रहिवासी यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, सुख सुविधा मिळाव्या, त्यांची भारताचे सुजाण नागरिक म्हणून नोंद व्हावी या उदात्त हेतूने नवीन मतदार नोंदणी तसेच बांधकाम कामगार व इतर कामगार नोंदणी शिबिराचे आयोजन सरिता एम.खंडारे अमरावती विधानसभा महिला अध्यक्षा,भिमक्रांती सामाजिक संघटना,महा.राज्य यांचे वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल ढेकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.


       सदर शिबिराची सुरुवात महामानव,विश्वरत्न,बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करून व पूजन करून केली. संघटनेचे महाराष्ट्र कार्यकारिणी सल्लागार मनोज खंडारे यांच्या हस्ते मेणबत्ती प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले.संत कबीर नगरातील रहिवासी यांनी तसेच आसपासच्या परिसरातील नवीन मतदारांनी तसेच बांधकाम कामगारांनी व इतर कामगारांनी सदर शिबिरात नोंदणी करून शिबिराचा लाभ घेतला, शिबिराबद्दल नागरिकांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत आभार मानले. नवीन मतदार नोंदणीचे अर्ज भरतांना कु.प्रणूक्षा वानखडे,कु.पूर्वी खंडारे,कु.प्राची इंगळे,कु.कोमल तायडे यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच कामगार नोंदणीसाठी संघटनेचे अमरावती कामगार जिल्हाध्यक्ष सुमित व्ही. गणवीर,ठाकूर मॅडम व संघटनेचे कामगार सदस्य यांनी नोंदणीचे अर्ज ऑनलाईन भरून दिले सदर शिबिरात दिवसभर संमिश्र प्रतिसाद मिळाला उन्हाचा वार्ता पारा पाहता शिबिराच्या मुख्य आयोजकांनी सावलीसाठी मोठा मंडप व पिण्याचे थंड पाणी उपलब्ध करून नागरिकांसाठी सोय केली सोबतच कार्यकर्त्यांकरिता थंडपेय व चहा-नाश्त्याची जागेवरच सुविधा उपलब्ध करून दिली. अशा प्रकारे संघटनेचे नवीन मतदार नोंदणी शिबिर व बांधकाम कामगार व इतर कामगार नोंदणी शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले.

   संघटनेच्या सदर शिबिराच्या यशस्वीते करिता सरिता मनोज खंडारे,मंगला वानखडे,सुमित गणवीर,विठ्ठलराव तंतरपाळे,मनोज खंडारे,सुनील बनसोड,रुपेश कुत्तरमारे,सागर मोहोळ,वंशदादा मते,प्रदीप थोरात,सुरज गवई,प्रेमीला इंगळे व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल ढेकेकर इत्यादी कार्यकर्त्यांनी श्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post