आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते एसटी बसचे लोकार्पण

 



श्रीक्षेत्र माहूर :  तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर आगरासाठी किनवट माहुर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे परीवहण मंत्री यांच्या कडे किनवट व माहुर अगारासाठी नविन बससेची मागणी केली होती ती मागणी मान्य केल्याने माहुर अगारासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पाच बसेस मिळाल्या त्या बसचे आ.भीमराव केराम यांनी माहूर ते दत्तशिखर असे सात किलोमीटर प्रवास करून लोकार्पण केले यावेळी बस उपलब्ध करून दिल्याने आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्र्यांचे आभार मानले.

     तिर्थक्षेत्र असलेल्या माहुर आगाराच्या बसेसची अवस्था दयनीय झाली असल्याने बसेस सतत नादुरुस्त होत असल्याने त्या प्रवाशांच्या सेवेत वेळेत उपलब्ध होण्यासाठी विलंब होत होता यांचा प्रवासी व साडेतीन शक्तीपीठापैकी एक मूळ शक्तिपीठ असलेल्या रेणुका माता भगवान दत्तप्रभू माता अनुसया यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे भाविकांना महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ कडून दर्जेदार सुविधा आणि नवीन बसेस मिळाव्या म्हणून किनवट माहुर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माहूर व किनवट या दुर्गम भागात नवीन बसेसची मागणी लावून धरली होती सततच्या पाठपुराव्यामुळे राज्यसरकारने नांदेड जिल्ह्यात माहुर अगारास नविन कोर्‍या बसचा पुरवठा केल्याने त्यांचे दि ३० रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आ.भीमराव केराम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आ. भीमराव केराम यांनी या बस मधुन दतशिखर पर्यंत चा प्रवास केला. यावेळी बसमध्ये त्यांच्या समवेत नगराध्यक्ष फिरोज दोसानी, प्रा. राजेंद्र केशवे, गोपू महामुने, अनिल वाघमारे ,संजय राठोड, पद्मा गिऱ्हे, अर्चना दराडे, राधाताई उपलेंचवार, स्वाती आडे ,किशोर जगत ,कांताराम घोडेकर, संदीप राठोड, अपिल बेलखोडे यासह एस टी महामंडळाचे कर्मचारी व अधिकारी होते..

Post a Comment

Previous Post Next Post