सेवानिवृत्त रेल्वेगार्ड गंगाधर मैसाजी वासेवार यांचे निधन
श्रीकांत राऊत यवतमाळ
यवतमाळ : वर्धा येथिल सेवानिवृत्त रेल्वेगार्ड गंगाधर मैसाजी वासेवार, रा.इस्लापूर (सांगवी) ता. किनवट जि. नांदेड हल्ली मुक्काम कृष्ण नगर शास्त्री चौक वर्धा यांचे अकस्मितपने शनिवारी (ता.२९) रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (ता.२९/०३/२०२५) रोजी शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान वर्धा येथिल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यू समयी त्यांचे वय ६९ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तिन मुली, एक मुलगा आणि सहा नातु असा आप्त परिवार आहे. त्यांनी त्यांच्या रेल्वेगार्ड म्हणुन अत्यंत चांगल्याप्रकारे जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल समाजात ते अतिशय लोकप्रिय होते. त्यांचे अंत्यसंस्कार वेळी नातलग व गावातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.