माहूर तालुक्यातील पत्रकार बांधवाकडून तहसीलदार किशोर यादव यांना निवेदन सादर
श्रीक्षेत्र माहूर : किनवट तालुक्यातील सारखनी येथील पत्रकार रशीद फाजलानी यांच्या विरुद्ध आकस बुद्धीने पोलीस स्टेशन सिंदखेड तालुका माहूर येथे दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी माहूर तालुक्यातील पत्रकार बांधवाकडून तहसीलदार किशोर यादव यांना दि 6 रोजी निवेदन देण्यात आले.
माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्यात सुडबुद्धीने मटका चालकां कडून खोटी तक्रार दाखल केल्यावरुन रशीद फाजलानी विरुद्ध गुरनं. ३१/२०२५, कलम ३०८ (२), (३), ३५१ (२), बीएनएस २०२३ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. वृत्तांकन करुन वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्या मटकाचालकाने खोडसाळपणाची तक्रार देऊन पत्रकाराची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. त्या मुळे या प्रकरणी योग्य ती चौकशी करून रशीद फाजलाणी यांच्या विरुद्ध दाखल केलेला खोटा गुन्हा परत घेण्यात यावा अशी विनंती निवेदनात करण्यात आलेली आहे.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंतराव कपाटे नंदकुमार जोशी विजय आमले अपील बेलखोडे राज ठाकूर संजय बनसोडे इलियास बावाणी यांचे सह पत्रकार बांधव उपस्थित होते.