मूर्तिजापूर - सामान्यपणे समाज हा डॉक्टरांना देवांच्या रूपाने पाहतो मात्र देवांच्या रूपातला डॉक्टर जनसामान्यांच्या आरोग्याचा काय खेळ मांडून आपली पोळी कशी भाजतो हे कुणालाच कळत नाही अशातला काहीसा प्रकार मूर्तिजापूर शहरात असलेल्या स्वयंघोषीत नामांकीत हॉस्पीटलचे संचालक एका हॉस्पीटलच्या मान्यतेवर दोन हॉस्पिटल चालवत असल्याचे बोलल्या जात असून सुजाण नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी ( मान्यता ) घेऊन त्यांच्या कडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते आणि विभाजन झाले असले तरी त्यापद्धतीची माहिती संबंधित विभागाला देणे गरजेचे असते मात्र मूर्तिजापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका स्वयंघोषीत नामांकीत हॉस्पीटलचे संचालक यांनी आपण स्वतः चालवत असलेल्या हॉस्पीटलची रितसर परवानगी ( मान्यता ) घेतली आहे परंतू दुसरी इमारत उभी करून त्यामध्ये अवैधरित्या हॉस्पीटल चालविल्या जात असल्याचे बोलल्या जात आहे. त्याचप्रमाणे गोर गरीब रुग्णांना काही आजारावर होणारा खर्च पाहता मोफत वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनेतही घोडबंगाल सुरु असल्याचे बोलल्या जात आहे. अवैधरित्या चालविणाऱ्या हॉस्पीटलमध्ये योजनेचा लाभ दिला जात आहे यादरम्यान एखाद्या रुग्णांच्या बाबतीत काही विपरीत घटना घडली तर त्यांच्या नातेवाईकाने न्याय मागावा कुणाला, आरोग्याशी खेळ मांडला याला जबाबदार कोण ? यावर मेहरबाण कोण ? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असून ही बाब लक्षात घेऊन याला आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जोर धरत असून यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.