कैलास नागरैंची आत्महत्या ही सरकारच्या नाकर्तेपणाचा बळी सरकार आणखी किती शेतकर्यांच्या आत्महतेची वाटपहात आहे.
आत्तापर्यंत जवळ पास 5 लाख शेतकर्यांनी शासनाच्या चुकिच्या धोरणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत.
शेतकरी संघटनेच्या आंदोलनात 36 शेतकर्यांनी बलीदान दिले. त्यांच बलिदान वाया जाऊ देणार नाही.व आम्ही शेतकरी सरकारची होळी केल्यशिवाय राहाणार नाही.
19 मार्च 1986 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हण गावचे 11 वर्षे सरपंच असलेले 125 एकरचे मालक साहेबराव करपे यांनी विद्युत बोर्डाने कनेक्षन कट केले.आणि हाता तोंडाशी आलेलं गव्हाच पिक डोळ्या समोर वाळून गेल म्हणून बायको मालती तीन मुली व मुलगा सर्व कुटुबांनी पवनार आश्रमात विष घातलेले भजे खाऊन आत्महत्या केली.ती शासन दरबारी पहिली नोंद झाली.
त्यासाठी शेतकरी संघटना 19 मार्चला 10 ते 5 वाजे पर्यंत एक दिवासाचा उपवास करून संवेदना व्यक्त करतोत शासनाचा शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त करतो.
त्यासाठी सर्व शेतकरी भावांनी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात 19 मार्च रोजी हजर रहावे.
"माझ्या शेती पुरस्कार प्राप्त दादा,, तुला भावपूर्ण श्रद्धांजली या देशातील व राज्यातील सरकारे व त्यांची व्यवस्था शेतकऱ्यांच्या आर्थिक विरोधात आहे. हे वारंवार सिद्ध झाले आहे, ही व्यवस्था बदलायची असेल तर,आत्महत्या हा योग्य उपाय नाही, त्यासाठी आपल्या शेतकरी कुटूंबातील युवक व युवतींनी एकजुट होऊन, देशातील समविचारी लोक, प्राध्यापक, विधितज्ञ, ज्येष्ठ अभिनेते, ज्येष्ठ पत्रकार, निवडक अभ्यासू पुढारी, शेतीतज्ञ, व साहित्यिक व सुशिशित लोकांना एक करण्याकरिता व शेतकरी विरोधातील धोरणे बदलविण्याकरीता शेतकरी विरोधात लढा उभा करण्याकरिता सर्वाँना एकजुट करणे हा उपाय करणे काळाची गरज आहे.."
रयत क्रांती संघटना युवती प्रदेशाध्यक्ष प्रिया अक्षय राऊत