" कृष्णकांत ढोले पुरोगामी विचारधारेचे प्रचारक " - प्रा.अरुण बुंदेले

" कृष्णकांत ढोले पुरोगामी विचारधारेचे प्रचारक "

                     - प्रा.अरुण बुंदेले


कामगार नेते कृष्णकांत ढोले यांचा सत्कार संपन्न


कै.मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठान व महानायक संघटनेचा उपक्रम


अमरावती, राजाभाऊ वानखडे सत्कारमूर्ती कृष्णकांत ढोले हे अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.कामगारांच्या अनेक समस्यांना सोडविणारे कामगार नेते असून महानायक संघटनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांनी सामाजिक क्षेत्रात भरपूर कार्य केलेले आहे व करीत आहेत.ते फुले - शाहू - आंबेडकरी पुरोगामी विचारधारेचे प्रचारक आहेत."असे विचार साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.

              ते दि.१३ मार्च २०२५ रोजी शिवटेकडीच्या पायथ्याशी संपन्न झालेल्या महानायक संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष व कामगार नेते कृष्णकांत भाऊरावजी ढोले यांच्या अभिष्टचिंतन प्रसंगी प्रमुख अतिथी पदावरून विचार व्यक्त करीत होते.

          कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक सुरेशभाऊ मेश्राम (संस्थापक अध्यक्ष,महानायक संघटना,अमरावती) तर प्रमुख अतिथी साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,न्यूज रिपोर्टर राजाभाऊ वानखडे ,महेश तायडे,समाजभूषण डॉ.शिवलाल पवार पत्रकार रवि कांबळे ,रवींद्र इंगळे, मिलिंद कांबळे,डॉ.नीलम रंगाळकर,विकास डोंगरे,गोलू बागडे,रोशन जंगम, रौराळे,मारुती खंडारे,प्रवीण मोकळे,ताजी,कवी मनोहर,विनोद मेश्राम,हरीश सुंदरवाणी,मोहम्मद शफी सौदागर होते.

        कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान अमरावती व महानायक संघटनेतर्फे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बुंदेले व महानायक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश मेश्राम आणि प्रमुख अतिथी तसेच फुले - शाहू -आंबेडकरी चळवळतील कार्यकर्त्यांनी महानायक संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष व कामगार नेते कृष्णकांत ढोले यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले. 

      याप्रसंगी राज्यसभेचे खासदार चंद्रकांतजी हंडोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

Previous Post Next Post