डोंबिवली(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)शारीरिक तंदुरुस्तीसाठी सर्वच ठीकाणी सकाळी जेष्ठ नागरिक महिला-पुरुष माॅर्निंग वाॅक साठी जात असतात.डोंबिवली मध्ये ही रोज महिला माॅर्निंग वाॅक साठी जात असतात.महिला दिनाचे औचित्य साधून नुकताच डोंबिवली योगा आणि माॅर्निंग वाॅक ग्रुप तर्फे महिलांनी जागतिक महिला दिन डोंबिवली जिमखाना बस स्टॅन्डवर मोठ्या उत्साहात साजरा केला.सभासद व जेष्ठ समाजसेवक अरविंद सुर्वे यांच्या संकल्पनेतून काही महिला व पुरुष यांच्यासाठी काही स्पर्धा आयोजित केल्या होत्या.परिक्षक म्हणून मंगेश खोत,रेखा खोत ,रवींद्र कुलकर्णी, बाळकृष्ण देसाई यांनी काम पाहिले.विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.कुमुदिनी मॅडम यांनी सर्व महिलांचे हळदीकुंकु व सुहासिक गजरे देऊन स्वागत केले.
प्रिया चव्हाण यांनी सर्व महिलांना भेट वस्तू दिल्या.जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने डोंबिवली एस.टी.बस स्टॅन्डच्या महिला कंट्रोलर कर्मचारी मनाली मोरे यांना संस्थेचे जेष्ठ सदस्य अरविंद सुर्वे यांच्या हस्ते संस्थेचे सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.सर्व महिलांनी केक कटींग केला व अल्पोपहाराचा कार्यक्रम संपन्न झाला.भोरखडे सरांनी कार्यक्रमाची सांगता व आभार प्रदर्शन केले. प्रदीप पाटील सर यांनी नेपथ्य व फोटोग्राफीची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली.जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आनंदाने व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.डोंबिवली योगा आणि माॅर्निंग वाॅक ग्रुपतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न
byGavakadachi Batmi
-
0