गावाकडची बातमी | फर्दापूर ग्रामपंचायतिच्या सरपंच पदी फातेमाबी उस्मान खान पठाण याची निवड

 


उपसरपंच पदी मनीषा भिमराव बोराडे याची बिनविरोध निवड


            छ.संभाजीनगर प्रतिनिधी/ सादिक शेख 

 सोयगाव : तालुक्यातील फर्दापूर येथे असलेल्या आदर्श ग्रामपंचायत व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या फर्दापूर ग्रामपंचायतिच्या सरपंच पदी फातेमा बी उस्मान खा पठाण तर उपसरपंच पदी बुद्ध महिला मनीषा भिमराव बोराडे याची बिनविरोध निवड करण्यात आली या समाजाला सरपंच उपसरपंच पदाचा आजपर्यंत मान मिळालेला नाही.

   या फर्दापूरच्या इतिहासात आता प्रथमच उपसरपंच पदाचा बुद्ध समाजाला मान मिळाला असून उपसरपंच पदी मनीषा भिमराव बोराडे याची बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वीचे उपसरपंच ज्याने उपसरपंच पदाचा राजीनामा दिला ते फिरोज खा पठाण बोलले होते की आता बौद्ध समाजाला प्रथमच उपसरपंच पदाचा बहुमान मिळेल आणि तो त्याचा शब्द आज खरा ठरला आहे.

   फिरोज पठाण हे फर्दापूर मधील एक सामाजिक मान जाणीव असेल सर्व समाजाला घेऊन चालणारे एक उमद नेतृत्व असून त्याच्यामुळे आज खऱ्या अर्थाने फर्दापूर येथे एक इतिहास निर्माण केला सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक ही 13 फेब्रुवारी रोजी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि या निवडणुकीत सरपंच उपसरपंच हे दोघीही बिनविरोध निवडून आले. तत्कालीन सरपंच रेणुका दीपक आगळे तत्कालीन उपसरपंच फिरोजखा चांदखा पठाण यांनी राजीनामा दिला होता माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन उपसरपंच फिरोजखा चांदखा पठाण यांनी दिलेला शब्द पळला सरपंच उपसरपंच पदाच्या निवड साठी दि. 13 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयत निवडणूक निर्णय अधिकारी चरणसिंग बहुरे नायब तहसीलदार राधाकिसन जाधव मंडळ अधिकारी वैभव जाधव तलाठी सजा फर्दापूर याच्या अध्यक्षतेखाली सदस्याची बैठक बोलविण्यात आली होती.

    यावेळी सरपंच पदासाठी फातेमाबी उस्मानखा पठाण तर उपसरपंच पदासाठी मनीषा भीमराव बोराडे याचे निर्धारित वेळेत दोनच अर्ज प्राप्त झाल्याने फातेमा बी उस्मान का पठाण तर मनीषा भीमराव बोराडे याची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. त्यावेळी ग्रामविकास अधिकारी सुनील मगरूळे माजी पंचायत समिती सदस्य विजय तायडे ग्रामपंचायत सदस्य गुलाब बर्डे योगेश शिंदे सामाजिक कार्यकर्ते शेख जाकेर दीपक आगळे मजीद सेठ आरिफ पठाण ग्रामपंचायत कर्मचारी गणेश वेल्हाळकर सुरेश शेळके जाकीर तडवी ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व सर्व नागरिक उपस्थित होते..


Post a Comment

Previous Post Next Post