डोंबिवली-: इंडियन काॅपीराईट प्रोटेक्शनचे मुख्य तपासी अधिकारी रामजित उर्फ जितु गुप्ता यांचे पथक व गुन्हे शाखा,कल्याण चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांनी डोंबिवली मानपाडा रोडवरील ओम साई अवार्ड या दुकानावर छापा टाकुन त्या दुकानात आकृती हे साॅफ्टवेअर बेकायदेशीर वापरत असल्याने दोन इसम व दुकान मालक यांच्या विरुद्ध मानपाडा पोलीस स्टेशन,डोंबिवली-पूर्व येथे काॅपीराईट कलम५१अ(१)व६३नुसार गुन्हा नोंद केला असून सदर कारवाई मध्ये रवी लालचंद वासवानी,दिपाली पाटील व गुन्हे शाखा घटक-३कल्याण चे पो.उप.निरीक्षक विनोद पाटील,पोलिस हवालदार सचिन भालेराव,विलास कडु,पोलिस.पो.ना.दिपक महाजन,पो.शि.गुरुनाथ जरग सरकरी वाहन चालक असे उपस्थित होते.पुढील तपास मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहेत.काॅपीराईट अधिकारी रामजित(जितु)गुप्ता यांनी दोन इसमांवर काॅपीराईट अंतर्गत कारवाई करुन गुन्हा नोंद केला आहे.
डोंबिवली मानपाडा रोडवरी'ओम साई अवार्ड'या दुकानात आकृती हे बेकायदेशीर साॅफ्टवेअर वापरल्याबद्दल गुन्हा दाखल
byGavakadachi Batmi
-
0