सिनेसृष्टीतील पन्नास कलावंतासह प्रख्यात नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य व नृत्यांगणा माधुरी पवार यांचे १८ रोजी "लाईव्ह परफार्मन्सेस"

 

       किनवटचा "शुशांत ठमके" रुपेरी पडद्यावर झळकणार

    किनवट - 'पिंटू की पप्पी' हा पाच भाषेतील चित्रपट २१ मार्च रोजी एकाच वेळी प्रदर्शीत होणार आहे. 

"अजय अतुल" यांनी गायिलेल्या एका गाण्याची ऑनलाईन लाँचिंग नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य व नृत्यांगणा माधुरी पवार यांच्या पन्नास कलावंतांच्या "लाईव्ह परमन्सेस"ने होणार आहे. शुशांत ठमके या नवख्या अभिनेत्याची प्रमूख भूमिका असलेला हा चित्रपट असून, सर्व सिनेसंगीत रसिकांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन अभियंता प्रशांत ठमके यांनी केले आहे.

      गोकुंदा येथील शासकीय विश्रामगृहात त्याच पार्श्वभूमिवर नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. शुशांत ठमके हा रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा झळकणार आहे. विधी आचार्य निर्मित, शिव हरे लिखित-दिग्दर्शित, प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्या मार्गदर्शनात तयार झालेला बीग बजेट बॉलीवूड चित्रपट "पिंटू की पप्पी" यातील दहा गाणी संगीत नृत्याच्या अविष्काराने गाजत आहेत.



     नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य व नृत्यांगणा माधुरी पवार किनवटला येणार आहेत. कोठारी येथील मातोश्री कमलताई ठमके शैक्षणिक संकुल येथे मंगळवारी १८ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून "लाईव्ह परमार्न्सेस" सादर करणार आहेत. किनवट तालुक्याच्या इतिहासातील किनवटकरांचे मुख्य आकर्षण ठरणाऱ्या या कार्यक्रमात नवोदित चित्रपट अभिनेता शुशांत ठमके, अभिनेत्री जान्या जोशी, विधी यादव यांच्यासह सिनेसृष्टीतील पन्नास कलाकारांच्या कलेची मेजवाणी रसिक श्रोत्यांना मिळणार आहे. नवोदीत कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी परिवारासह उपस्थित राहाण्याचे आवाहन आयोजक अभि. प्रशांत ठमके यांनी पत्रकार परिषदे दरम्यान केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post