शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती..
अमरावती : जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील सेंट्रल बँकेला भीषण आग आग इतकी भीषण होती की यात बँकेतील पैशासह सर्व साहित्य जळून खाक बँक सुरू असताना आग लागल्याने सर्व कर्मचारी घाबरून बँक बाहेर पडले.
सुदैवाने यात कुठली जीवित हानी झाली नाही..
चांदुर रेल्वे येथील अग्निशामक दल आगीवर नियंत्रण मिळवते आहे. मात्र आग विजत नसल्याने धामणगाव आणि अमरावती येथून देखील अग्निशामक बंब बोलवण्यात आले. बँकेला अचानक आग लागली दिसल्याने नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली..
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी देखील या ठिकाणी बंदोबस्त वाढवला..