माहूर येथे जागतिक वन दिन साजरा

 

                  छायाचित्र- ईलीयास बावानी

वृक्ष लावगड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन झाडांची रांगोळी स्पर्धा घेऊन जागतिक व दिन साजरा


श्रीक्षेत्र माहूर : जागतिक वन दिनानिमित्त उपवनसंरक्षक नांदेड केशव वाबळे तसेच सहायक वनसंरक्षक जंकास व कॅम्पा किनवट गिरी व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा. माहूर रोहित जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल माहूर मीर साजिद अली सर तसेच वनरक्षक दीपक माने, निशांत दुर्गे, अक्षय तिडके वनसेवक समवेत जि.प. प्राथमिक शाळा मोजे माहूर येथील भोजंती तलाव येथे शाळामुख्याध्यापक,शिक्षक, विद्यार्थी यांना वनाचे महत्व बाबत जागृती केली व वृक्ष लागवड करून झाडांची रांगोळी स्पर्धा घेऊन जागतिक वन दिन साजरा करण्यात आला.

 21 मार्च जागतिक वनदिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा भोजंती तलाव येथे वन विभागाकडून वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी वृक्ष लागवड केली.

    तसेच येथील विद्यार्थ्यांना जागतिक वन दिनानिमित्त वनाचे झाडांचे महत्त्व सांगून झाडांचे चित्र काढणे बद्दल रांगोळी स्पर्धा घेतली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post