मूर्तिजापूर - समाजाचा घटक म्हणून समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या युवक- युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन भारत सरकार या संस्थेचे विदर्भ प्रमुख डॉ. शंकर शहाळे यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर फांउडेशन भारत सरकार प्रमाणेच मुंबई या सामाजिक संस्थेत सर्व जिल्हा स्तरावरील विदर्भातील जिल्हा अध्यक्ष पदाचा पदभार देणे आहे तरी सर्व जाती-धर्माच्या तरुण-तरुणींना असे आवाहन करण्यात येते की समाजाच्या गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी स्वतः समाजासमोर उभे राहा आपल्या महाराष्ट्रात दलित गरीब जनतेला योग्य न्याय मिळत नसल्याने त्यांना त्यांना समाजात अडीअडचणींना सामोरे जावे लागते अशा अनाथ निराश्रे अज्ञानी दलित समाजातील जनतेला योग्य मार्गदर्शनासाठी इच्छुकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन भारत सरकार प्रमाणित मुंबई या संस्थेत आपली नाव नोंदणी करून संस्थेला सहकार्य करावे विदर्भात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाप्रमुख पदासाठी नियुक्ती करण्यात येत आहे त्यासाठी उत्सुक तरुण-तरुणींना विनंती की आपण जिल्ह्याचे पदे स्वीकारून समाजाची सेवा करावी व अनाथ गोरगरीब अज्ञान दलित समाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी स्वतः समोर येऊन डॉ. शंकर शहाळे विदर्भ प्रमुख ,विदर्भ प्रमुख कार्यालय भवानी नगर जुनी वस्ती मूर्तिजापूर जिल्हा अकोला यांच्याशी ८३७८९२८५९४ या मोबाईल क्रमांकावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्क साधावा व आपली नोंदणी शक्य तितक्या लवकर करावी व आपली पदे निश्चित करावी आज पासून पंधरा दिवसाच्या मुदतीत या संधीचा लाभ घ्यावा येताना पासपोर्ट फोटो आधार कार्ड झेरॉक्स शैक्षणिक प्रमाणपत्र सोबत घेऊन कार्यालयाशी संपर्क साधावा.