राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांनी ग्राम पातळीवर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी व शेतमजुरांना डिजिटल लिटरसी( digital literacy)बद्दल अवगत करा व शेतकऱ्यांना आर्थिक फसवणुकी पासून वाचवण्यासाठी प्रशिक्षित करा- तक्षशिला महाविद्यालय दारापूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रकाश साबळे यांचे विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन
विद्यार्थ्यांनो, मोबाईलचा अतिवापर टाळा- डॉ. कमलाकर पायस यांचे मनोगत.
तक्षशिला महाविद्यालय दारापूर चे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर दर्यापूर तालुक्यातील डोंगरगाव येथे दि. 25 /2 /2025 रोजी सुरू झाले.
सदर शिबिराची उद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य व शेतकरी चळवळीतील अग्रगण्य नेतृत्व प्रकाश साबळे हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव सन्माननीय डॉ. कमलाकर पायस, तसेच सामाजिक कार्यकर्ते व अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर मार्के, प्रशासन अधिकारी सचिन पंडित, प्राचार्य प्रा. डॉ. मल्लू पडवाल , सुरज विधळे, कार्यक्रम अधिकारी डॉ. यशवंत हरणे, श्री राहुल चोरपगार , प्रगतशील शेतकरी रुपेश कडू आदी मान्यवर मंडळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होती.