नांदेड, किनवट : किनवट येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या कै.उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्रात लवकरच भव्य विविध वनस्पतींचा औषधी उपयोग करून समाजाचे आरोग्य अबाधित ठेवणाऱ्या ग्रामीण भागातील लोकवैदकांची कार्यशाळा मार्च २०२५ च्या दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याचे संशोधन केंद्राचे समन्वयक प्रोफेसर डॉ.मार्तंड कुलकर्णी यांनी कळविले आहे.
त्यासाठी माहूर किनवट परिसरातील ग्रामीण आदिवासी भागातील वाड्या, पाड्या, गुड्या, तांड्यावरील लोकवैदकांनी आपली नांव नोंदणी संशोधन केंद्रात करावी असे आवहान करण्यात येत आहे.
या कार्यशाळेमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या परिसरातील विविध वनऔषधींचा अभ्यास व्हावा, त्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी व जास्तीत जास्त लोकवैद्यकांना त्यातून आर्थिक हातभार लागावा असा विचार या कार्यशाळेत केला जाणार आहे.
त्याकरिता लोकवैदकांनी आपली नावे किनवट येथील कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्रात नोंदवावी. वनौषधीचा गेल्या अनेक वर्षापासून समाजासाठी उपयोग करणाऱ्या लोकवैदकांना निमंत्रित करण्यात येणार असून मान्यवर लोकवैदकांचा विद्यापीठाच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी विद्यापीठाच्या व नांदेड येथील आयुर्वेदिक महाविद्यालयातील संशोधक, मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मिळणार असल्याची माहिती संशोधन केंद्राकडून देण्यात आली.
तरी अधिकाधिक लोक वैदकांनी ८६०५१८७८७४ क्रमांकावर संपर्क साधून आपले नाव नोंदणी करावी अशी विनंती करण्यात येत आहे..