डॉ. आशिष धर्माळे वैद्यकीय क्षेत्रातील एक प्रभावी , सेवाभावी व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व.
श्री संत अच्युत महाराज ज्ञानपीठ बोरगाव धर्माळे तालुका जिल्हा अमरावतीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सेवाभावी कार्य, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिर , गरजू ,गरीब लोकांना मदतीचा हात अशा कित्येक विविध सामाजिक कार्याचा ध्यास असलेला ध्येयवेडा माणूस म्हणजे डॉ.आशिष धर्माळे
दि.६/२/२५ रोजी डॉ.आशिष धर्माळे यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसी समाजभूषण सन्मानाने त्यांचा गौरव राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी प्रकाश साबळे, तसेच होमिओ डॉक्टर असोसिएशन अमरावती चे माजी अध्यक्ष व सेवाभावी व्यक्तिमत्व डॉ. गुणवंत डहाणे, सामाजिक कार्यकर्ते संदीप पाचघरे यांनी डॉ. आशिष धर्माळे यांचा शाल ,श्रीफळ, गणेश प्रतिमा व मोमेंटो देऊन सत्कार केला.