नाशिक नाशिकरोड : प्रतिनिधी डॉ शाम जाधव- दिनांक ७/२/२०२५ रोजी परिघा वेलफेअर फाउंडेशन व संविधान कराओके क्लब नाशिकरोड यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई जयंती निमित्ताने जेलरोड लोखंडे मळा येथील मंगलमूर्ती नगर बुद्ध विहार येथे ' रमाई गीत व भीम गीतांचा ' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमात रोशन अहिरे, उत्तम जाधव, रूपाली तायडे, वनिता आहेर, संजय परमसागर, मीनाताई पाठक, सविता सहानी, रितिका गायकवाड, स्नेहल भालेराव, संजय देशपांडे आदि गायकांनी त्यागमूर्ती रमाई व क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर आधारित गजलेली गाणी सादर करून आदरांजली वाहिली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रजनन करून अभिवादन केले.
याप्रसंगी परिघा फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी शेगावकर व संविधान कराओके क्लबचे संचालक राजन गायकवाड व मीनाताई गांगुर्डे तसेच आरपीआयचे महिंद्र बोराडे, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष हेमंत गायकवाड, रिपाई चे जिल्हाध्यक्ष सुभाष बोराडे, जिमखाना सेक्रेटरी मनोज चिमणकर, उप व्यवस्थापक शिवपाल पंचभाई यासह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.