किनवट : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, किनवट यांच्या वतीने गोकुंदा येथील विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रावर सोमवार, दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परीक्षेचा उद्देश स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्याची चाचणी घेण्यासाठी तसेच त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन मिळावे, हा आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या विशेष उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाच्या दिशेने एक योग्य दिशा मिळण्यास मदत होईल. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा.
Tags
GavakadachiBatmi
.jpeg)

