शिवजन्मोत्सवा निमित्त किनवट येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

 



किनवट : छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती किनवट च्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त दिनांक 19 फेब्रुवारी रोजी दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करून शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे. 

      कर्ण कर्कश वाजणारे डीजे यावर मध्ये धुंद होऊन अश्लील पणे थिरकणारी तरुणाई या अनिष्ट परंपरेला फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अभिप्रेत अशी सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. 

    यासाठी भरगच्च विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शिवजन्मोत्सव 2025 या उत्सवामध्ये जास्तीत जास्त शिवप्रेमींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक उत्सव समिती किनवट च्या वतीने करण्यात आले.


शिवजन्मोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये दि.10 फेब्रुवारी 2025 रोजी, गोकुंदा येथे विविध अकॅडमी व स्पर्धा केंद्र मध्ये स्पर्धा परीक्षा संपन्न झाली., दि. १९ फेब्रुवारी शिवजन्मोत्सव दिनी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुनी नगरपालिका इमारत किनवट येथे  वक्तृत्व व चित्रकला रंगभरण स्पर्धा सकाळी ७:०० ते १०:३० राहिलं, सकाळी ९.४५ वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक एस व्ही एम परिसर किनवट येथून मोटरसायकल रॅली निघेल,  ११.०० वाजता मान्यवराच्या हस्ते अभिवादन व महिलांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न होईल, ११.१० या वेळेत लेझीम पथकाच्या सादरीकरण सह शोभायात्रा,  दुपारी १२.३० वाजता कलावती गार्डन किनवट येथे प्रसिद्ध व्याख्यात्या ऍड. वैशाली डोळस यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महिला विषयक दृष्टिकोन या विषयावर व्याख्यान होईल. सायंकाळी ६:३० वाजता  शिवचरित्रावरील महानाट्य शिवाजी अंडरग्राउंड इन भीम नगर मोहल्ला या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात येईल. जास्तीत जास्त शिवप्रेमींनी शिवजन्मोत्सवात सामील व्हावे असे आव्हान सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती समितीच्या वतीने करण्यात आले.





Post a Comment

Previous Post Next Post