महसूल बुडवणाऱ्या मंडळाधिकारी व तलाठी यांच्यावर कारवाई करा - बबन वानखेडे

 


किनवट  : गौण खनिज वाहतुक पावती नसतानाही दोन हायवा गाड्यावर कारवाई न करता आणि ताब्यात न घेता एका खाजगी इसमाकडे ताबा देऊन शासन दरबारी दंड न भरता गाड्या सोडून देणाऱ्या मंडळ अधिकारी लाठकर आणि तलाठी फड यांची सखोल चौकशी करुन निलंबनाची कारवाई करण्याची मागणी बबन वानखेडे यांनी उपविभागीय अधिकारी किनवट यांच्याकडे केली आहे.



दिनांक 24/12/2024 रोजी मंडळ अधिकरी लाठकर आणि तलाठी फड यांनी खरबी रोडवरती अवैध गौण खनिज वाहतुक करणारे दोन हायवा ट्रक क्रमांक MH26 CH 2178 आणि MH26 CH 2160 मुरुमाची अवैध वाहतूक करणारे पकडले होते. परंतु सदरील प्रकरणी योग्य ती कारवाई न करताच त्यांनी नाममात्र पंचनामा करुन एका खाजगी सुपरवाझर कडे ताबा पावती बनवत दोन्ही गाड्या सोडुन देण्यात आलेल्या आहेत.



 सदरील प्रकरणी उपविभागीय अधिकारी किनवट यांनी व्यक्तीशः चौकशी करुन शासनाच्या बुडालेल्या महसूलाची भरपाई गाडी मालका कडुन करुन घेत अवैध वाहतुक करणाऱ्या गाड्यावर कारवाई न करणाऱ्या मंडळ अधिकारी लाठकर आणि फड यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करत महसुल चोरावर योग्य ती कारवाई करावी अशा आशियाची मागणी सामाजिक कार्यकर्ते बबन वानखेडे यांनी उपविभागीय अधिकारी किनवट यांच्याकडे केली असून सोबत सदरील दोन हायवा चे फोटो जीपीएस टॅग मध्ये जोडलेले आहेत. सदर निवेदनाची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी महोदया सदर प्रकरणी काय कारवाई करतात याच्याकडे नागरिकाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post