जिल्हा प्रतिनिधी : पवन पाटणकर
भारतीय दलित पॅंथर अमरावती जिल्ह्याच्या वतीने 14 जानेवारी ला दुपारी 2 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती येथे मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव देऊन केलेल्या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नामांतराच्या तब्बल 16 वर्षे चाललेल्या लढ्यात भारतीय दलित पॅंथर चे पोचीराम कांबळे, गौतम वाघमारे, सुहासिनी बनसोड यांच्यासह 12 भीम वीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.
तर या लढ्यात इतरही पॅंथरच्या एकूण 29 शूरवीरांनी आपला देह गमावला. त्या सर्व दलित पॅंथरच्या शहिदांना मानवंदना देऊन भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव मिळावे हा या नामांतराचा लढा दलित व बहुजनांच्या अस्तित्व व अस्मितेचा मुद्दा बनला होता. महाराष्ट्र राज्यातील भारतीय दलित पॅंथरच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आक्रमक आंदोलन केले.
ज्यामुळे शरद पवार सरकारला झुकावेच लागले आणि शेवटी 14 जानेवारी 1994 रोजी सरकारने मराठवाडा या नावासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव जोडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव देऊन नामविस्तार करण्यात आला.
या आंदोलनात लाखो आंबेडकरी अनुयायी जेल मध्ये गेले. हजारो कार्यकर्ते पोलिस हल्ल्यात जखमी व अपंग झाले. तर हजारो कार्यकर्त्यांचे घर - संसार उध्वस्त झाले.
भारतीय दलित पॅंथर चे राज्य संघटक लक्ष्मणराव मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली या नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला पूज्य भदंत बुद्धप्रिय, सुधाकरराव पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख वक्त्यांची नामांतरणाच्या आंदोलनावर ऐतिहासिक भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय दलित पॅंथर चे अमरावती जिल्हा अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन विजय बनसोडे यांनी केले आणि आभार प्रदर्शन मनोज धुळेकर यांनी केले. या कार्यक्रमाला पॅंथरचे जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी सर्वश्री लक्ष्मण मेश्राम, सुधाकर पाटील, राजूभाऊ शेंडे, विजय बनसोड, प्रवीण पाटील, मनोज धुळेकर, अजय रामटेके, शिवदास गायकवाड, रवी भाऊ शेंडे, प्रशांत रामटेके, केशव गायकवाड, अरुण वासनिक, पंकज रंगारी, सचिन मेश्राम, धर्मा भाऊ बागडे, प्रकाश डोंगरे, अंकित मेश्राम, हिरालाल बागडे, नंदू खडसे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.