अमरावती , राजाभाऊ वानखडे : मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इरविन चौक येथील पुतळ्याला अभिवादन करून दि 14 जानेवारी 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा विजय असो अशा घोषणा देत पक्षाचे वरिष्ठ नेते मा महिंद्र भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला व शहीद भीमसैनिकांना आदरांजली वाहण्यात आली.
मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळालेच पाहिजे या मागणीसाठी अविरत 17 वर्ष संघर्ष केला अखेर 14 जानेवारी 1994 रोजी महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर करून संघर्षाला विराम दिला त्या संघर्षात अनेक भीमसैनिकांनी आपला बलिदान देऊन 16 वर्ष लढा दिला याची आठवण म्हणून डॉक्टर बाबा आंबेडकर चौक येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून शहीद झालेल्या भीमसैनिकांना आदरांजली वाहण्यात आली.
त्यावेळी आरपीआय आठवले चे जिल्हाध्यक्ष मा ओमप्रकाश बनसोड सुनील रामटेके अशांत रंगारी विजय रामटेके मनोहर घोडेस्वार राजू धावणे अशोक वानखडे उपस्थित होते.