मनपा आयुक्त सचिन कलंत्रे व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी एच एम पी व्हि वायरस साठी आरोग्य विभाग सज्ज
विद्यार्थ्यांना शाळेत केले मार्गदर्शन
अमरावती, गाव सहेली टीम - संपूर्ण देशात सध्या हंगामी स्वरूपात एच एम पी व्ही व्हायरस च्या प्रसार मुळे नागरिकांच्या आरोग्यास धोखा असल्याने महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शन सूचना जाहीर केल्या आहे सोबतच आरोग्य विभागाने सुध्दा नागरिकांसाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे सुरू केले आहे आणि अमरावती शहराचे मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी सर्दी ,खोकला, ताप तसेच हुमन मेटा निमोवायरास चे लक्षण दिसल्यास त्याची तपासणी करण्यासाठी आयसोलेशन शहरी आरोग्य केंद्र येथे भेट दिली तेथील एक्सरे, थुंकी तपासणी ,आर टि पी सी आर , अंटी गेन तपासणी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले सोबतच अतिरिक्त आयुक्त यांनी वडाळी मनपा शाळा क्रमांक 14 येथे मुलांना व्हायरस बाबत माहिती दिली मी व माझी जबाबदारी समजून स्वच्छ्ता बाळगावी असे मुलांना पटवून सांगितले व डॉ विशाल काळे आरोग्य अधिकारी यांनी उर्दू शाळा बडनेरा येथे मुस्लिम मुलांना त्यांचे भाषेत आजार बद्दल माहिती दिली.
प्रतिबंधात्मक उपाय सांगितला तसेच वैद्यकीय अधिकारी यांना तपासणी साठी आलेल्या सर्व रुग्णाचे रक्त तपासणी सोबतच संसर्ग आजाराच्या तपासण्या मोफत करून घेण्याच्या सूचना दिल्या व डॉ रुपेश खडसे साथ रोग नियंत्रण अधिकारी यांनी शाळेतील मुल, मुली व जनतेला तोंडाला मॉक्स लावणे ,सोशल डीटस्निंग ठेवणे ,वारंवार सनिटेझर नी हात धुणे असे मार्गदर्शन केले ह्या टास्क फोर्स मध्ये मनपा आयुक्त सचिन कलेंत्रे , अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक , आरोग्य अधिकारी डॉ विशाल काळे , साथ रोग अधिकारी डॉ.रुपेश खडसे ,वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विनी खडसे आयसोलेशन , डॉ अकिब खान मोदी हॉस्पिटल , डॉ वैशाली मोटघरे वडाळी, विक्रांत राजूरकर , मुख्यालय डॉ.कृषकांत पाथरे दस्तुर नगर , सहायक आयुक्त जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर ,हैदर अली, वैभव देवकर, विकी भेंडकर ,मधुसूदन निर्मळ ,दिवाकर भरडे, व आरोग्य सेवक , सेविका यांनी शहरात शहरी आरोग्य केंद्र व मनपा शाळेत कार्यक्रम घेऊंन जनजागृती करून घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले..