बदलापूर - शहरातील नागरिकांच्या समस्यांकडे होणारे दुर्लक्ष,भ्रष्ट अधिका-यांवर प्रशासनाचा अंकुश नाही.अधिका-यांडुन सतत होत असलेला भ्रष्टाचार आणि नागरिकांना भेडसावणा-या समस्यांन विरोधात राष्टवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेवर १४ जानेवारी२०२५ रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
मोर्चा संदर्भातील सविस्तर निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड शरदचंद्र पवार पक्ष,महाराष्ट्र प्रदेश चिटणीस हेमंत रुमणे,बदलापूर शहर उपाध्यक्ष अभिजित सकट तसेच आर.पी.आय.(R.K.) पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अशोक गजरमल यांच्या हस्ते देण्यात आले.तसेच या धडक मोर्चा संदर्भात पुर्व सुचना म्हणून बदलापूर पुर्व पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनाही निवेदन देण्यात आले.याप्रसंगी सर्व पुरुष व महिला आघाडी शहर पदाधिकारी उपस्थित होते.