युवाहित मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी राज्यस्तरीय संघटनेच्या वतीने चिखलदरा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न
युवा प्रशिक्षणार्थीची रक्तदान करून आपल्या मागण्याबाबत शासनाकडे हाक..
राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या शुभहस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन...!
दिनांक 11/1/25 रोजी ग्रामीण रुग्णालय चिखलदरा येथे 55 रक्तदात्यांनी केले रक्तदान..!
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांचा रक्तदान शिबिरा घेण्यामागे पुढाकार...!
प्रत्येक परिवारातील तरुणांनी रक्तदान करून गरजूंचे जीव वाचवण्याचे पुण्य कर्म करावे... खासदार डॉ.अनिल बोंडे
मेळघाट सारख्या आदिवासी बाहुल्य भागात रक्तदान चळवळ व्यापक करा .. प्रकाश साबळे
शिबिराचे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रकाश साबळे होते.
रक्तदान शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष राजेंद्र सिंग सोमवंशी, भास्करराव हरमकर, माजी सभापती राजेश मांगलेकर, पंजाबराव नाईक, महेश भाई, दत्ताभाऊ किटुकले, डॉ.जाकिर साहेब, डॉ. आदित्य पाटील, वेदांत सूर पाटणे ,जिल्हाध्यक्ष आकाश गडपाल, गोपाल महल्ले, प्रफुल्ल भोरे, श्रीकृष्ण सगने गुरुजी , अक्षय सरोदे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.