मूर्तिजापूरात विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बंद खोलीत डांबले...!

 





मूर्तिजापूर - तालुक्यातील कुरुम मंडळातील सन २०२३चे ५३० शेतकऱ्यांचे पीएम कृषी विमा लाभापासून वंचित ठेवून शेतकऱ्यांच्या भावनाना ठेच पोचून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे झालेला नुकसानाचे पैसे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या दादागिरीमुळे रगडले असून. मूर्तिजापूर विधानसभा ३२ चे आमदार हरीष पिंपळे यांनी विश्राम गृहात विमा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी चर्चा करताना विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी शेतकऱ्यांना विमा कंपनीचे पैसे का बर जमा झाले संदर्भात विचारणा केली असता. आमदार पिंपळे यांना त्यांनी खोटे माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली.आकडेवारी देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असता.



 हरीश पिंपळे हे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सदर तत्पर असतात. त्यांनी आक्रमक होऊन विमा कंपनीच्या प्रतिनिधींना खोलीत डांबरून बंदिस्त करून ठेवले. जोपर्यंत शेतकऱ्यांचे विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही तोपर्यंत तुम्हाला खोलीतून सुटका करण्यात येणार नाही. अशी आक्रमक भूमिका आमदारांनी घेतली. 



या आढावा बैठकीला अकोला जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे, तहसीलदार शिल्पा बोबडे, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गोरे, बहुसंख्य शेतकरी प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. सन २०२४ चे चना व फळबाग यांची मूर्तिजापूर तालुक्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी करून सुद्धा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे शेतकऱ्यांना विमा अनुदान रकमेपासून वंचित राहावे लागत आहे. 

  राज्याचे कृषिमंत्री राज्याची कृषिमंत्री ॲड माणिकराव शिवाजीराव कोकाटे लक्ष देतील का.? 

   किंवा विमा कंपनीवर शासन कठोर कारवाई करण्यास कमकुवत पडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तरी शासनाने विमा कंपनीवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना विमा रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. ही मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post