विक्रेत्यांच्या संघर्षाचा अखेर विजय राज्य लॉटरीला अभय बंदीचे संकट टळले


मुंबई (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

गौरवशाली परंपरा असलेल्या महाराष्ट्र राज्य लॉटरी बंदीच्या प्रशासकीय स्तरावर सुरू झालेल्या हालचालींना थांबविण्यात आले असून बंदीचे संकट हे विक्रेत्यांचे नेते विलास सातार्डेकर यांच्या आक्रमक पावित्र्यामुळे टळले आहे विक्रेत्यांच्या संघर्षाचा अखेर विजय झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट विक्रेत्यांच्या प्रतिनिधींनी मंत्रालयात घेतली आणि बंदीला जोरदार विरोध केला त्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले विक्रेत्यांच्या भावनांचा विचार सकारात्मक करण्यात येईल या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी लवकरच चर्चा करण्यात येईल. विक्रेत्यांसोबत राज्य सरकार आहे! ;यानंतर विक्रेत्यांनी एकच जल्लोष केला.


महाराष्ट्र राज्य लॉटरी ३१ मार्च पर्यंत चालू ठेवावी आणि त्यानंतर बंद करावी तसेच लॉटरीची छपाई करू नये! असा जो आदेश सूचना करण्यात आली होती ती या भेटीनंतर टळली आहे पुन्हा लॉटरीच्या छपाईचा निर्णय यामुळे पर्यायाने घेतला जाण्याची शक्यता आहे. लॉटरी बंद केली तर हजारो विक्रेते आणि त्यावर अवलंबून असलेल्या लाखोंना उपासमारीच्या संकटाला सामोरे जावे लागेल यासाठी लॉटरी विक्रेत्यांचे जेष्ठ नेते विलास सातार्डेकर यांनी राज्यभरातील लॉटरी विक्रेत्यांचे आंदोलन उभे केले आहे त्या संघर्षमय दबावामुळे सरकार नमले असून हा विक्रेत्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे` सातार्डेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विधान परिषदतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या प्रश्नी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे लॉटरी विक्रेत्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली होती. सर्वानी एकत्र येऊन लॉटरी बंद न करता नव्या पद्धतीने सुरू करावी असेही त्यांनी म्हटले. या बैठकीनंतर विक्रेत्यांशी बोलताना सातार्डेकर म्हणाले तूर्त जरी बंदीचे संकट टळले असले तरीही आता विक्रेत्यांची जबाबदारी वाढली आहे. यापुढे सर्वाच लॉटरीची विक्रमी विक्री करुन हक्कासोबत कर्तव्यही आपण सारे पूर्ण करुया भविष्यातही ही एकजूट कायम राहावी त्यामुळे मागण्यांना न्याय मिळू शकेल. या बैठकीला विधान परीषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,आमदार सुनिल शिदें उपस्थीत होते.


तसेच प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, लॉटरी आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सचिव ( लेखा व कोषागरे ) रिचा बागला, उपसचिव (वित्त) मनीषा कामटे लॉटरी विभागाचे कक्ष अधिकारी शीला यादव, कक्ष अधिकारी रोहित सोनवणे, उपसंचालक आनंद जोशी, सं. तु.ओहाळ त्याचप्रमाणे सर्व संघटनेचे प्रतिनिधी चंद्रकात मोरे,स्नेहल शहा, मनोज वारंग, दिलीप धुरी, अनुज बाजपेयी, गणेश कदम राजेश बोरकर, कमलेश विश्वकर्मा, अविनाश सावंत, सिद्धेश पाटील तसेच आँर्गनायझर विजय सामी, महेंद्र गणात्रा, मनिष शहा,महेश गौडा आणि लाॅटरी विक्रेते हजर होते.

Post a Comment

Previous Post Next Post