मूर्तिजापूर - शहरात नेहमी वर्दळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मूख्य रोडच्या बाजूला असलेला व्हॉल्वचा खड्डा एखाद्याच्या जिवीतास धोका निर्माण करून अपघाताला कारणीभूत ठरणार असून संभाव्य घटनेला जबाबदार कोण असे नागरिकांतून बोलल्या जात आहे.
शहरातील मुख्य चौक म्हणून ओळख असलेला आणि नेहमी जास्तीत जास्त वर्दळ राहणारा चौक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक याच परिसरात हाकेच्या अंतरावर बसस्थानक असल्याने तालुक्यासह जिल्ह्या बाहेर जाणाऱ्या येणाऱ्या बस याच ठिकाणाहून ये-जा करतात व खाजगी वाहन सुद्धा येथूनच जातात विद्यार्थी,पादचारी,दुचाकी, टांगा यासह इतर वाहनांची गर्दी नेहमी पहावयास मिळते याच ठिकाणी मुद्रांक विक्रेता व झेरॉक्स सेंटर असल्याने याठिकाणी नेहमी ग्राहकांची गर्दी दिसून येते त्याच दुकानाच्या एकदम समोरासमोर सदरचा विना सुरक्षा व्यवस्था केलेला खड्डा आहे ग्राहकांना दुचाकी पार्क करण्यासाठी अडचणी निर्माण होत असून घाई गडबडीत दुचाकी उभी करून दुकानात जाते वेळी खड्यात पडून अपघात किंवा विपरीत घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक दोन वर्षा पूर्वी जिल्हा परिषद चे अभियंता हे सदरच्या गड्यात पडून पाय फॅक्चर झाल्याचे येथील दुकानदार सांगतात. संभाव्य घटनेला आळा घालण्यासाठी संबंधित विभागाने यावर ठोस उपाय योजना त्वरित कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे. यावर प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी नगर परिषदचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शेषराव टाले यांचेशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
-----------------------------------------------
दुकानात येणाऱ्या ग्राहकांना गाडी पार्किंग करायला अडचण निर्माण होत असून विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधीत विभागाने उपाय योजना कराव्यात.
राहुल साबू, दुकानदार,मूर्तिजापूर
---------------------------------------------
मुख्य रस्त्यावर असल्याने कोणाच्याही जिवावर बेतणारा खड्डा आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने त्याला काही तरी व्यवस्था करण्यात यावी.
अक्षय कट्यारमल, दुकानदार,मूर्तिजापूर
-----------------------------------------
वाहनांची व नागरिकांची गर्दी पाहता संभाव्य घटनेला आळा घालण्यासाठी संबंधित विभागाने सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी जेणे करून कुणाचा अपघात होणार नाही.
पंकज ठाकुर, दुकानदार,मूर्तिजापूर