पुणे(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)संस्थेने कायमच आपले वेगळेपण जपले आहे.नुकताच अमोदिनी फाऊंडेशनच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या पहिल्या कार्यक्रमात घरेलु काम करणा-या कष्टकरी मावशींकरता त्यांचे कौतुक व सत्कार सोहळा आयोजित केला होता.कार्यक्रमात संस्थेच्या वतीने अध्यक्षा एडवोकेटा अनिशा फळसणकर यांनी संस्थेची माहिती आणि कष्टकरी स्रियांकरिता कायदेशीर आणि समुपदेशन संदर्भात आमोदिनी फाउंडेशन करत असलेल्या कार्याची माहिती दिली.सदर कार्यक्रमाअंतर्गत सर्व महिलांना मार्गदर्शनपर माहिती एडवोकेट मोना मोरे आणि अध्यक्ष यांनी दिली.कार्यक्रमाची सुरूवात सर्व मावशींना हळदी कुंकू लावून फुल देऊन सत्काराने झाली.तसेच यावेळी मावशींना फुल ना फुलाची पाकळी म्हणून संस्थेतर्फे रोज लागणा-या डबा आणि पिशवी असे वाटप करण्यात आले.तसेच मावशींना चहापानाची आणि स्वादिष्ट अल्पोपहाराची सोय करण्यात आली.सदर कार्यक्रमास संस्थेमधीलच एक आमोदिनी सौ.प्रीती शिंगवी यांनी भेटवस्तू आणि अल्पोपहार त्यांची कंपनी "विघ्नहर्ता काॅर्पोरेशन"यांच्याकडून स्पाॅन्सर केला होता.संस्थेकडून भेटवस्तू आमोदिनी संस्थेतील पदाधिकारी व सदस्य एडवोकेट अनिशा फळसणकर,एडवोकेट संध्या बागुल,एडवोकेट मोना मोरे,एडवोकेट मृणाल जोशी,चिरंजीवी बनसोडे,कल्पना फडतरे,अनिता पाटील यांच्या हस्ते देण्यात आल्या.संस्थेचा उपक्रम खूप स्तुत्य असल्याचे आणि असा सत्कार झाल्याबद्दल आनंद वाटत असल्याचे सर्व मावशींनी आवर्जून सांगितले.तसेच सदर कार्यक्रमातच एका मावशींनी आपली कायदेशीर अडचण सांगून त्याबाबत योग्य तो सल्लाही मिळवला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व आमोदिनींनी योग्य तो हातभार लावून आमोदिनी फाऊंडेशनचा तिसरा वर्धापनदिन उत्साहात संपन्न झाला.