मूर्तिजापूर - शहरातील जुनीवस्ती भागातील महाराजा चौकात सुभाष डेअरीवर काम करणाऱ्या १८ वर्षीय युवकास ३२ वर्षीय युवकाने हातावर लोखंडी राँड मारून जखमी करून जिवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याची घटना १६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे .
शहरातील गजबजलेल्या जुनीवस्ती भागातील महाराजा चौकात सुभाष दूध डेअरीवर काम करणारा विशाल शरद पवार वय १८ वर्ष रा. किन्ही पवार हा काम करीत असलेल्या दुध डेअरीत यातील आरोपी अब्दुल जफर अब्दुल अन्नान वय ३२ रा. मलाईपुरा याने डेअरीच्या आतमध्ये प्रवेश करुन हातातील लोखंडी रॉडने विशालच्या उजव्या हातावर मारून त्याला जखमी केले व शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. सदरची फिर्याद व वैद्यकीय अहवालावरून भारतीय न्याय संहितेच्या ३३३, ११८(१), ३५२, ३५१(२) कलमांतर्गत शहर पोलीसांनी आरोपी अब्दुल जफर अब्दुल अन्नान विरुद्ध गुन्हा दाखल करुन तातडीने अटक करुन जेरबंद केले . पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक आशीष शिंदे , गणेश सुर्यवंशी , अंमलदार सुरेश पांडे , नंदकिशोर टिकार , पो का सचिन दुबे , गजानन खेडकर , विजय साबळे हे तपास करीत आहेत.



