२१ वर्षीय तरुणीने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या



ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद






मूर्तिजापूर - तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिरपूर - सिरसो मार्गावरील शेतात २१ वर्षीय तरुणीने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना १६ जानेवारी रोजी ११ वाजताच्या दरम्यान समोर आली आहे .सदर प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

      मूर्तिजापूर शहरात बँक काँलनी येथील रहिवासी तसेच मातृसेवा हास्पिटलमध्ये काम करणारी २१ वर्षीय नम्रता विनोद गरदे हीने १६ जानेवारी रोजी ११ वाजताच्या दरम्यान हिरपूर- सिरसो मार्गावरील मनोज ढगे यांच्या शेताजवळ नम्रताची दुचाकी उभी असून विहिरीच्या काठावर बॅग दिसून आली .अशी माहिती नम्रताचे मामा सतीश नामदेव भगत वय ५२ यांना मिळताच ते धावतपळत घटनास्थळी दाखल झाले . उपस्थित ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत बॅटरी लावून पाहले असता नम्रताचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला . सदरच्या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले .पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post