विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
किनवट /माहुर : किनवट नगर परिषद प्रशासनाने आमदार आमदार भीमराव केराम व तत्कालीन नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्या अथक प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दि.०६/०६/२०२३ रोजी आणून भूमी पूजन करून २० महिने होऊन गेले आहेत तरी पुतळा बसविण्यासाठी प्रशासनाच्या कोणत्याही हालचाली दिसुन येत नाहीत. पुतळा बसविणे साठी वेळ लागत होता तर पुतळा आणून बंदिस्त करुण पुतळ्याची विटंबना करायची होती काय असा प्रश्न शिवप्रेमी मधून उपस्थित होत आहे.
19 फेब्रुवारी 2025 छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना सुद्धा प्रशासनाकडून पुतळा बसविण्या विषयाच्या कुठल्याही हालचाली दिसून येत नाहीत. त्यामुळे यावर्षीची शिवजयंती सुद्धा शिवप्रेमींना बॅनरवरच करावी लागणार की काय अशा संतप्त प्रतिक्रिया शिवप्रेमी मधून व्यक्त केल्या जात आहेत.
अनेक शिवप्रेमींनी पुतळा बसविण्यासाठी अनेक वेळा आंदोलन उपोषण केले पण प्रशासनाकडून त्यांना फक्त तारीख देऊन वेळ काढू पणा करण्यात आला.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सुद्धा प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज चौक किनवट येथे जायमोक्यावर येऊन स्थळ पाहणी केली पण पुतळा बसविण्या संदर्भात काय अडचण येत आहे हे समजायला काही मार्ग नाही.
सदर पुतळा उभारणीची निविदा झाली, नगरपालिका प्रशासनाकडे सर्व संबंधित विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आहेत मग अडचण कुठे आहे.? या सर्व पुतळा बसविण्याच्या समस्येवर एकमत करण्यासाठी प्रशासन व शिवप्रेमी यांच्यातील दुवा म्हणून लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार भीमराव केराम यांनी या पुढाकार घेऊन 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती पूर्वी महाराजांचा पुतळा विराजमान करून शिवप्रेमींचा परिषद उत्साह द्विगुणीत करावा अशी मागणी शिवप्रेमी कडून होत आहे.